मराठवाड्यात अतिवृष्टी, विदर्भात पुढील चार दिवस ऊन-पावसाचा खेळ

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई
maharashtra weather राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठा तडाखा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, मराठवाड्यातील काही तालुक्यांमध्ये सरासरी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
 

maharashtra weather update heavy rain in marathwada, yellow alert issued for 11 districts 
सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, काही धरणे भरली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, राज्यात आज २ ऑगस्ट रोजीही पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रविवारी राज्यातील ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण विभागातही मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात मात्र पुढील चार दिवस maharashtra weather  ऊन आणि पावसाचा खेळ सुरू राहण्याचा अंदाज आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ४५४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसानंतर आता पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.नागपुरात काल दिवसभरात केवळ ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तापमानात काहीशी वाढ झाल्याने उकाड्याची जाणीव वाढू लागली आहे. २८ जुलै रोजी नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावत एका दिवसात तब्बल १८० मिलिमीटर पावसाची नोंद केली होती. त्यानंतर सलग तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे आतापर्यंतची पावसाची कमतरता भरून निघाली.मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला असून, सकाळपासून अनेक भागांत उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.