मोदींच्या निर्णयाने माझा मुलीचे भविष्य वाचले!

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |

New Delhi, Modi's saved my daughter's future, Prime Minister Narendra Modi
 

द
यावेळी मुलीच्या आईने सोशल मीडिया वापराबाबतही चिंता व्यक्त केली. लहान मुले सोशल मीडियावरील चुकीच्या प्रभावाला सहज बळी पडतात. त्यामुळे इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी निर्बंध असावेत, अशी मागणी त्यांनी केली. चुकीच्या संगतीमुळे आणि नकारात्मक विचारांमुळे मुलांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.ही घटना नीट-यूजी पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान समोर आली होती. कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना काही आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यातील एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारी अल्पवयीन मुलगी दिसून आली होती.
 
 
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडिओ शेअर करत संयम आणि शांततेचे आवाहन केले होते. अशा प्रकारची विधाने करणारे लोक दिशाभूल झालेले असतात आणि त्यांना राग किंवा सूडाने उत्तर देण्याऐवजी संयम राखला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, मुलीने स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये तिने स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे सांगितले असून, तिच्याकडून मोठी चूक झाल्याची कबुली दिली आहे. पंतप्रधानांविरोधात केलेले वक्तव्य अक्षम्य असल्याचे सांगत तिने आपल्या कृतीबद्दल लाज वाटत असल्याचे म्हटले.
मुलीने सांगितले की, ती आपल्या मैत्रिणींसोबत कनॉट प्लेस येथे गेली होती. त्यावेळी आंदोलन सुरू असल्याने ती तिथे सहभागी झाली. आंदोलनस्थळी काही लोक पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देत होते आणि त्या वातावरणात तीही वाहून गेली. ही तिची पहिली आणि शेवटची चूक असल्याचे सांगत तिने संपूर्ण देशाची माफी मागितली.मात्र, माफी मागितल्यानंतरही या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी नोएडा पोलीस ठाण्यात मुलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर झिरो एफआयआर नोंदवून हे प्रकरण नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. तक्रारदाराने आरोप केला आहे की, मुलीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असून, अशा वक्तव्यांमुळे द्वेष निर्माण होण्याची आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे.