नागपूर ,
Podar Prep School, Jagannath Nagar पोदार प्रेप २, जगन्नाथ नगर, बेसा येथे 'साक्षरता व संख्याज्ञान मेळावा २०२६' उत्साहात पार पडला. पालक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमातून मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये खेळ, कृती आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विकसित करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी 'सिम्फॉनिक्स' आणि 'नंबर मॅजिक' कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. विविध शैक्षणिक स्टॉलमध्ये पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनुभवाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत पालकांना मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील सक्रिय भागीदार बनण्याचा संदेश देण्यात आला.या उपक्रमाची संकल्पना पोदार प्रेपच्या डायरेक्टर स्वाती पोपट वस्त यांची होती. मुख्याध्यापिका मोना सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
सौजन्य:सोनाली गलघाटे,संपर्क मित्र