सहा महिन्यांत माझा मृत्यू होऊ शकतो

राम कपूरचा धक्कादायक खुलासा

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई

ram kapoor रिअॅलिटी शो लॉकअप सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असून, या कार्यक्रमातील स्पर्धक सातत्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक अनुभव उघड करत आहेत. याचदरम्यान अभिनेता राम कपूरने केलेल्या एका भावनिक आणि धक्कादायक खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बडे अच्छे लगते हैं मालिकेच्या काळात आपण गंभीर नैराश्याचा सामना करत होतो आणि डॉक्टरांनी आपल्या प्रकृतीबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला होता, असे राम कपूरने सांगितले.
 
 

ram kapoor reveals doctor warned he had only six months to live during depression phase 
राम कपूरने सांगितले की, बडे अच्छे लगते हैं मालिकेच्या काळात तो आयुष्यातील सर्वात कठीण नैराश्याच्या अवस्थेतून जात होता. त्यावेळी त्याची पत्नी गौतमी हिलाही त्याच्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेची कल्पना नव्हती. मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत होते. त्याच्या वाढत्या वजनाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती आणि काही काळासाठी तो सर्वाधिक लोकप्रिय आणि उच्च टीआरपी मिळवणाऱ्या कलाकारांपैकी एक बनला होता. मात्र, या काळात त्याचे वजन सातत्याने वाढतच गेले.
प्रकृतीबाबत बोलताना राम ram kapoor  कपूरने सांगितले की, डॉक्टरांनी त्याला स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, त्याची तब्येत इतकी खालावली आहे की पुढील सहा महिन्यांत त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्याला डायबेटिक स्ट्रोक येण्याचा गंभीर धोका असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते. त्यावेळी त्याला दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घ्यावे लागत होते. रक्तातील साखरेची पातळी ४००, ५०० ते ६०० पेक्षाही अधिक होती, तर दुसरीकडे तो दिवसाला तब्बल १४ ते १४ तास काम करत होता.या सर्व परिस्थितीचा त्याच्या स्वभावावरही मोठा परिणाम झाला होता, असे सांगताना राम कपूर म्हणाला की, प्रेक्षकांचे प्रेम, प्रसिद्धी आणि पैसा मिळत असल्यामुळे त्याने स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच्या वागण्यात मोठे बदल झाले. “मी खूप वाईट माणूस बनलो होतो. मी सहा-सहा तास उशिरा शूटिंगला पोहोचत होतो. सेटवर बसून दारू पित होतो. मी अक्षरशः राक्षस बनलो होतो,” अशी कबुली त्याने दिली. मात्र, आपल्या मुलांमुळेच आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची हिंमत मिळाली आणि बदल करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही राम कपूरने यावेळी सांगितले.