आर्णी,
heavy rains दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळल्याने अरूणावती, अडाण व पैनगंगा नदीला पूर आल्याने त्या दुथडी भरून वाहत आहे. तर नदी-नाल्याकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात 29 जुलैला संध्याकाळी संततधार पावसाला सुरुवात झाली. 30 जुलैला दिवसभर व रात्र्भर संततधार पाऊस झाल्याने तालुक्यात 203 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
संततधार पावसामुळे आर्णी येथील अरूणावती नदीला पुर आल्याने पुराचे पाणी शहरातील मोमीनपुरा, शास्त्रीनगर, शनिमंदीर, बहीरमनगर, उदयनगर, प्रकाशनगर, भारती शाळेमागील भाग, आमणी रोड परिसर भागातील लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील जीवनापयोगी वस्तू, धान्य ओले झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही दुकानात पाणी शिरल्याने दुकानदाराचे नुकसान झाले. पूर आल्याने नदी-नाल्याकाठच्या लोकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. तसेच नदी- नाल्याकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेती खरडून गेली. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्यासोबत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
तालुक्यातील भंडारी 22, ब्राम्हणवाडा 16, तरोडा 25, शेकलगाव 5, विठोली 5, बेलोरा 25, आयता येथील 13 घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.heavy rains आर्णी येथील शंभरावर लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर लोणी येथील प्रकाश धनराज जाधव, तेंडोळी येथील भाऊराव हिरामण राठोड, उमरी येथील मंदा सिद्धार्थ कांबळे यांचे घर पडल्याने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.