ग्रामपंचायतींना जनसुविधां’साठी मिळणार ९० लाखांपर्यंत निधी!

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बोरकर यांची माहिती

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मालेगाव,
shankarrao borkar ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अत्यंत महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा,वार्षिकयोजने अंतर्गत जनसुविधांसाठी देण्यात येणार्‍या विशेष अनुदानाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता प्रत्येक ग्रामपंचायतीला तब्बल ९० लाखांपर्यंतचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव बोरकर यांनी दिली.
 
 
shankarrao borkar
 
गावाच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. हीच बाब विचारात घेऊन राज्य शासनाने हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या वाढीव निधीच्या माध्यमातून गावांमध्ये पुढील महत्त्वपूर्ण आणि नावीन्यपूर्ण विकासकामे केली जाणार आहेत. गावात सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था सुधारणे तसेच शासकीय कार्यालयांवर सोलर सिस्टीम बसवणे.ज्ञान व क्रीडा विकास, वाचनालयासाठी सुसज्ज नवीन इमारत उभारणे आणि गावातील क्रीडांगणांचा कायापालट करणे.गावाच्या हद्दीतील शासकीय जागांचे सुशोभीकरण करून पर्यावरणाचा समतोल राखणे, गावातील इतर सार्वजनिक आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणे.ग्रामपंचायतींना थेट ९० लाखांपर्यंत निधी उपलब्ध झाल्यामुळे गावांचा कायापालट होण्यास मदत होईल. स्थानिक पातळीवरील मूलभूत प्रश्न सुटून ग्रामीण जीवनमान उंचावेल. अशी माहिती भाजपा प्रदेश