श्यामकांत जहागीरदार यांचा गौरव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक स्मृती पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |

 

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली

lokmanya-tilak-memorial-award ‘मायहोम इंडिया’ या संस्थेने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. २०२६ चा पहिला पुरस्कार ‘तरुण भारत’चे नवी दिल्लीतील राजकीय संपादक श्यामकांत जहागीरदार यांना जाहीर झाला आहे. श्यामकांत जहागीरदार चार दशकांपासून ‘तरुण भारत’मध्ये कार्यरत असून, त्यांनी विविध जबाबदारीच्या संपादकीय पदांवर काम केले आहे.


jahagirdar 
 
lokmanya-tilak-memorial-award लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत १ ऑगस्टला राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये ‘मायहोम इंडिया’तर्फे आयोजित एका समारंभात हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तसेच गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष विजय गोयल, भाजपाचे माजी खासदार आणि प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिम्हन राव, ‘मायहोम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर तसेच ‘मायहोम इंडिया’चे दिल्ली एनसीआर अध्यक्ष बलदेव राज शर्मा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्यामकांत जहागीरदार यांना प्रदान करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह आणि २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
lokmanya-tilak-memorial-award ‘ अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक हे महान लेखक आणि निडर पत्रकार होते. सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘मायहोम इंडिया’ दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना, छायाचित्रकारांना तसेच निवेदकांना हा पुरस्कार देणार आहे.