देवळी,
universal friendship स्काऊट चळवळीतून आदर्श नागरिक घडत असतात. या दृष्टिकोनातून स्काऊट गाईडचे उपक्रम खेळातून शिक्षण, कृतीतून उपक्रम व छंदातून व्यवसायाकडे व उपक्रमातून नेतृत्वकला यावर आधारित आहे. स्कार्फ केवळ परिधान करण्यासाठी नसून तो विश्व मैत्री व बंधुभाव याचे प्रतीक आहे. जागतिक स्कार्फ दिनानिमित्त आयोजित केलेले उपक्रम प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी केले.
स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील रोव्हर रेंजर युनिटतर्फे जागतिक स्कार्फ डे कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक नितेश झाडे, रोव्हर लीडर संतोष तुरक व रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
यावेळी रेंजर लीडर वैष्णवी शिरभाते, रेंजर लीडर कल्याणी लिखार, रेंजर लीडर कोमल शितळे, सहाय्यक रेंजर लीडर समीक्षा निवारे, पायल चौके, सत्येश्वरी सावरकर, सहाय्यक रोव्हर लीडर रितेश बुटे व दुर्गेश पोटे उपस्थित होते.universal friendship
याप्रसंगी टाकाऊ वस्तुपासून कलात्मक वस्तू तयार करून हस्तकला हा उपक्रम राबवण्यात आला तसेच नवीन रोव्हर व रेंजर यांना स्कार्फ परिधान करून स्काऊट गाईड चळवळीचे सदस्य बनवण्यात आले.
जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगून स्कार्फ दिवसाचे महत्त्व विशद केले तर जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर यांनी स्कार्फचा उपयोग प्रथमोपचार, जंगल भ्रमंती, ट्रेकिंग, आपत्ती व्यवस्थापन व विविध उपक्रमांमध्ये केला जातो आणि म्हणूनच स्काऊटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्कार्फला अनन्य साधारण महत्त्व दिलेले असल्याचे ते म्हणाले. संचालन रेंजर लीडर कोमल शीतळे तर आभार रेंजर लीडर कल्याणी लिखार हिने मानले.
यशस्वीतेकरिता वैष्णवी कन्नाके, स्नेहा मडकाम, यामिनी पारधी, जानवी झोड, आरती मरघडे, साक्षी पारिसे, सलोनी अजमिरे, यश साटोणे, कुंदन कावडे, युवराज डफरे व रोव्हर रेंजर्स यांनी परिश्रम घेतले.