नागपूर,
Tilak Death Anniversary रामदासपेठ मारुती देवस्थान ट्रस्ट, लेंड्रा पार्क, नागपूर यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अमोल पुसदकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्ष अशोक पत्की यांनी प्रास्ताविक केले.
अमोल पुसदकर यांनी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, "स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या घोषणेचा संदर्भ देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम टिळक पर्स फंडाच्या देणगीतून आयोजित करण्यात आला. सचिव पळशीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सौजन्य:आशिष नाईक,संपर्क मित्र