इराणवरील हल्ला टळला?

ट्रम्प यांचा मोठा दावा

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's bold claim अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईची तयारी पूर्ण झाली होती, मात्र ती अखेरच्या क्षणी स्थगित करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला झाला असता तर तो दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या लष्करी कारवाईंपैकी एक ठरला असता. मात्र इराण आणि मध्य-पूर्वेतील काही देशांच्या विनंतीनंतर अमेरिकेने हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया मंचावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणवर कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सज्ज होती. मात्र, चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना संधी देण्यासाठी लष्करी कारवाई पुढे ढकलण्यात आली. त्यांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित करारात होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणे आणि इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करणे या प्रमुख अटींचा समावेश आहे.
 
 
फग
 
ट्रम्प यांनी असा दावाही केला की, या कराराला पुढे नेण्यासाठी इस्रायलने अमेरिकेसोबत सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच मध्य-पूर्वेतील अनेक देशांनी युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने सुचवलेल्या अटी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यामुळेच हल्ला स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. जगाच्या भविष्यासाठी आणि इराणच्या स्थिर व समृद्ध भविष्यासाठी हा करार लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत मध्य-पूर्वेतील अनेक विमानसेवा उड्डाणे रद्द करू शकतात, काही भागांत बॉम्बस्फोटांचा धोका निर्माण होऊ शकतो आणि अमेरिकन दूतावास किंवा अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा या सूचनेत देण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी मध्य-पूर्व सोडण्याचा विचार करावा किंवा त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले होते.