गांजेगाव येथील पैनगंगा नदीच्या पुलावर 2 ते 3 फूट पाणी

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
ढाणकी,
painganga river bridge at ganjegaon तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाला जोडणाèया महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच उमरखेड-ढाणकी-हिमायतनगर बस सेवाही बंद करण्यात आली आहे.
 
 
painganga river bridge at ganjegaon
 
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी धोक्याच्यावर गेली आहे. यामुळे ढाणकी ते हिमायतनगर या राज्य मार्गावरील गांजेगाव पुलावरून 2 ते 3 फूट पाणी वाहत आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करावी, असे सांगण्यात आले आहे. पुलावर पाणी आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची उमरखेड-ढाणकी-गांजेगाव-हिमायतनगर मार्गावरील सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
 
 
याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व रुग्णांना बसला आहे. पर्यायी मार्गाने जाण्यासाठी प्रवाशांना सुमारे 25 ते 30 किमीचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वेळ व इंधनाचा मोठा खर्च वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षांपासून दर पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. 2 ते 3 महिने हा भाग संपर्कापासून तुटतो. त्यामुळे या भागातील व्यापारी, शेतकरी व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.
 
 
याविरोधात ढाणकी, गांजेगाव, हिमायतनगर येथील नागरिकांनी एकत्र येत नवीन उंच पूल बांधण्याची मागणी लावून धरली आहे. सध्याच्या पुलापेक्षा 10-12 फूट उंचीचा नवीन पूल तातडीने मंजूर करावा. यासाठी विशेष निधी उपलब्ध करून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. लहान पूल बांधून दरवर्षी दुरुस्ती करण्यापेक्षा एकदाच उंच व भक्कम पूल बांधा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.