लग्नास होकार दिल्यास सिलेब्रेशन नाही तर ‘गुडबाय’

बेलतरोडीतील हत्याकांडाचा खुलासा

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur beltarodi murder case ‘तिने जर लग्नास होकार दिल्यास सिलेब्रेशन करणार होतो आणि नकार दिल्यास दोघांचेही जीवन संपविणार होतो, अशी योजना आरोपी प्रियकराची होती. प्रेमदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमधील खोलीला फुगे आणि फुलांनी सजवली होती आणि ठरल्याप्रमाणे लग्नाची मागणी घातली. तिने नकार देताच तिच्या पोटात चाकू भोसकून खून केला आणि स्वत:वरही चाकू मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवानी राजानंद गजभिये (वय २८, अजनी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर किरण संजय आत्राम (वय ३०, अजनी रेल्वे क्वॉर्टर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
 

nagpur beltarodi murder case marriage refusal leads to shocking hotel room murder 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि रेल्वे विभागातून निवृत्त झालेले राजानंद यांची मैत्री होती. त्यामुळे त्याचे घरी येणे-जाणे होते. यादरम्यान, त्याची ओळख शिवानीशी झाली. राजनंद यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे शिवानी नोकरीवर लागली. अजनी लोकोशेड येथे नोकरी करीत असताना किरण आणि शिवानी यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाहित असलेल्या किरणने घटस्फोट देऊन शिवानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवानी प्रेमसंबंध कायम ठेवण्यास तयार होती पण लग्न करण्यास टाळाटाळ करीत होती. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये किरणने मंगळवारी दुपारी शिवानीला बोलावले. त्याने लग्नाची मागणी करण्याची तयारी करुन ठेवली होती. दुपारीच हॉटेलमधील खोली फुगे आणि फुलांनी सजवली. शिवानीसाठी लाल साडी आणि लग्नाचे काही साहित्य आणले होते. ठरल्याप्रमाणे किरण हा शिवानीला लग्नाची मागणी घालणार होता. तिने लग्नास होकार दिल्यास लगेच भांगेत कुंकु भरुन आणि हार घालून लग्न करण्याचा बेत होता. मात्र, शिवानीने आजही लग्नास नकार दिल्यास थेट तिला जीवाने ठार करुन स्वत:ही आत्महत्या करण्याचा कट होता. शिवानी होटेलमध्ये आली आणि दोघांनीही बराच वेळ सोबत घालवला. काही तासांनी किरणने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने टाळाटाळ केली.
प्रेयसीसह स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न
किरणने शिवानीवर चाकूने हल्ला केला. nagpur beltarodi murder case त्यानंतर स्वत:वरही वार करुन जखमी करुन घेतले. शिवानीचा खून केल्यानंतर किरणने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोलीतील आरडाओरड ऐकू येताच हॉटेल व्यवस्थापक आणि स्टाफने धाव घेतली आणि घटना उघडकीस आली. सध्या किरणवर मेडिकलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती अजुनही चिंताजनक असून त्याच्यावर बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.