एमडी, एमएस आणि डीएनबी धारकांसाठी मोठी संधी!

१८ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
great opportunity for md ms and dnb उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत तब्बल १,१५६ पदे भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या मोहिमेद्वारे १,११२ सहाय्यक प्राध्यापक आणि ४४ प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १८ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना १ सप्टेंबर २०२६ पर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. जाहिरात क्रमांक D-1/E-1/2026 नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व अटींचा काळजीपूर्वक आढावा घेऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
great opportunity for md ms and dnb
 
या भरती प्रक्रियेत वैद्यकीय विशेषज्ञांच्या आधारावर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये एमडी (MD), एमएस (MS) आणि डीएनबी (DNB) यांसारख्या उच्च शैक्षणिक अर्हतांचा समावेश आहे. यासोबतच संबंधित विविध पदांनुसार आवश्यक अनुभवाची अटही लागू करण्यात आली आहे. या भरतीतील वयोमर्यादेनुसार १ जुलै २०२६ रोजी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी किमान वय २६ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर प्राध्यापक पदासाठी किमान वय ३५ वर्षे आणि कमाल वय ५५ वर्षे असावे लागेल.
 
अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या वेळापत्रकानुसार १ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज भरल्यानंतर, परीक्षा शुल्क भरणे आणि अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आपल्या अर्जाची प्रिंटआउट आणि सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आयोगाच्या कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.
 
या भरतीसाठी उमेदवाराच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क आकारले जात आहे. सर्वसाधारण, ईडब्ल्यूएस (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी हे शुल्क ₹१०५ आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी शुल्क ₹६५ निश्चित करण्यात आले आहे. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ₹२५ तर माजी सैनिकांसाठी ₹६५ शुल्क आकारले जाईल. महिला, स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रित आणि क्रीडा कोट्यातील उमेदवारांना त्यांच्या संबंधित मूळ प्रवर्गांनुसारच शुल्क लागू राहणार आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UPPSC च्या अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in वर जाऊन लॉगिन करावे आणि ऑनलाईन माहिती भरून शुल्क जमा केल्यानंतर अर्जाची प्रत सुरक्षित ठेवावी.