नागपूर,
Atre Layout, Pratap Nagar भागवताचार्य सौ. मृण्मयी अमर कुळकर्णी (भाटवडेकर) यांच्या श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन १९ ते २५ ऑगस्टदरम्यान श्री राजराजेश्वरी ललिता महात्रिपुरसुंदरी मंदिर, अत्रे लेआऊट, प्रतापनगर येथे करण्यात आले आहे.
श्रीमद् भागवत महापुराण हे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा अमृतवर्षाव करणारे दिव्य पुराण असून, भाविकांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहून श्रीकृष्ण नामस्मरण व भागवत कथेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भागवत कथा दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.
सौजन्य:आशीष नाईक संपर्क मित्र