राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Datta Meghe Ayurvedic College दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हर्षला राजुरकर होत्या.
 

meera 
 
 
 
ग्रंथालयाला ज्ञानाचे उत्कृष्ट केंद्र बनविण्यात ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांची भूमिका मोलाची असून, प्रत्येक ज्ञानसाधकाला योग्य माहिती, संसाधने व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य ग्रंथालय प्रभावीपणे करते, असे प्रतिपादन डॉ. सोनाली वैरागडे व डॉ. स्नेहल कुकडे यांनी केले.यावेळी पुस्तक देणगी अभियानाचे आयोजन करण्यात आले. ग्रंथालयाचा संग्रह समृद्ध करण्यासाठी पुस्तके देणगी देणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल प्रज्ञा भडांगे, अजय कुथे, साक्षी मोहोड, राहुल नायडू व डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांची उपस्थिती होती.
सौजन्य: निकिता लुटे ,संपर्क मित्र