नागपूर,
Dayal Nagar, Saraswati Layout दयाल नगर, सरस्वती लेआऊट परिसरात वीज कर्मचारी इलेक्ट्रिक पोलवर चढून जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. पोलपर्यंत साधी शिडीदेखील पोहोचत नसताना कर्मचाऱ्याला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
वीज वितरण कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी व योग्य शिडी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सौजन्य: राजेंद्र वाडी, संपर्क मित्र