मुंबईवरून भारत विद्यालयात आले फिरते म्युझियम

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
हिंगणघाट,
Hinganghat Bharat Vidyalaya छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या म्युझियम ऑन व्हील्स या विशेष उपक्रमांतर्गत सुसज्ज फिरते संग्रहालयाची बस १९ ऑगस्ट रोजी हिंगणघाट येथील भारत विद्यालयात आली. सीआयटीआयच्या सीएसआर उपक्रमातून राबविण्यात येणार्या या उपक्रमाचा जर तुम्ही संग्रहालयापर्यंत येऊ शकत नसाल, तर संग्रहालय तुमच्यापर्यंत येईल हा उद्देश आहे. हडप्पा, इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन यांसह प्राचीन जगाची बसमधून सफर सुरू असून विद्याथ्र्यांना यावेळी ५ हजार वर्षे जुन्या संस्कृती या फिरत्या म्युझियममधून अनुभवायला मिळाल्या.
 

Hinganghat Bharat Vidyalaya Hosts Museum on Wheels from Mumbai; Students Explore 5,000-Year-Old Civilizations 
ऐतिहासिक संबंध- भारत आणि प्राचीन विश्व या संकल्पनेवर आधारित या बसचे रूपांतर फिरत्या वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे. बसमध्ये जगातील प्रमुख ५ प्राचीन संस्कृतींची माहिती आणि प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. म्युझियमच्या चमूने विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. या चमूमध्ये वरिष्ठ शैक्षणिक मार्गदर्शक चिन्मय गवांडे, प्रकल्प समन्वयक अनुजा चौहान, सहाय्यक शैक्षणिक मार्गदर्शक धनश्री शितोळे, बस चालक शिवाजी तावरे, बस सेवक प्रदीप तळेकर आणि उपक्रम सहाय्यक मयूर भांडारे यांचा समावेश आहे.
विद्याथ्र्यांना हडप्पा संस्कृतीतील सुनियोजित शहरी नियोजन, जलनिस्सारण आणि ‘नर्तकीची’ कांस्य मूर्ती; मेसोपोटेमिया संस्कृतीतील झिगुरॅट्स आणि हडप्पाशी झालेला समुद्री व्यापार; इजिप्त संस्कृतीतील पिरॅमिड, ममीकरण आणि नाईल नदी; चिनी संस्कृतीतील शांग राजवंश, शेती आणि ओरेकल हाडापासून विकसित झालेली लिपी; तसेच बॅ्ट्रिरया-मार्जियाना, युनेटिस आणि एजियन या कांस्ययुगीन संस्कृतींची माहिती दिली.या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सुभाष टाकळे, कविता घोडे, उपमुख्याध्यापक मनीषा कोंडावार आणि पर्यवेक्षक नीलाक्षी बुरीले उपस्थित होत्या. बसमध्ये ठेवलेल्या विविध वस्तू, चित्रे आणि माहिती फलक पाहून विद्याथ्र्यांनी मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारले. पाठ्यपुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याने विद्याथ्र्यांना आनंद झाला.या उपक्रमामुळे विद्याथ्र्यांना जागतिक इतिहासाची प्रत्यक्ष ओळख झाली आणि ज्ञानात भर पडली. शाळेच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.