शूटिंगदरम्यान कार्तिकला गंभीर दुखापत

दोन दिवसांत शस्त्रक्रियेचा सल्ला

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
मुंबई
kartik aaryan बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन शूटिंगदरम्यान जखमी झाला असून त्याला मुंबईतील फोर्टीस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कबीर खान दिग्दर्शित स्पोर्ट्सवर आधारित चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकच्या दोन्ही गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कार्तिकच्या गुडघ्यांवर दोन दिवसांत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
 

kartik aaryan injured during shooting, admitted to mumbai hospital; knee surgery advised 
कार्तिक सध्या काश्मीरमधील एथलीट तजामुल इस्लाम यांच्या बायोपिकमध्ये किकबॉक्सिंग कोचची भूमिका साकारत आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा निर्माता स्वतः कार्तिक आर्यन असून, त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘डोपामाइन’ आहे.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर कार्तिक काही महिने विश्रांती घेणार आहे. त्यानंतर तो अनुराग बासु यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत श्रीलीला दिसणार आहे.