समर्पण फाउंडेशनतर्फे मंगळागौर उत्सव उत्साहात

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
mangalagaur festival celebrated सावनेर येथील समर्पण फाउंडेशनतर्फे मंगळागौर उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समर्पण फाउंडेशनच्या महिला सदस्य ॲड. अन्वेषा मुलमुले, अनुराधा नवधिंगे, सोनाली उमाटे, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. वैशाली दाते, डॉ. गौरी मानकर, निशा गहरवाल, निशा नारेकर, भावना बागडे आदींनी पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृती व परंपरा जपण्यासोबतच महिलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले.
 
 
mangalagaur festival celebrated
 
सौजन्य: धनंजय मुलमुले, संपर्क मित्र