जीवाशी केळ बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
मुंबई
FDA मुंबईतील अंधेरी परिसरातील प्रसिद्ध ‘जिमिज बर्गर’ हॉटेलमध्ये खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये मागवलेल्या व्हेजिटेरियन बर्गरमध्ये चक्क काचेचा तुकडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच आंबोली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 

Mumbai Jimi 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तनिषा गोगरी ही तरुणी १६ ऑगस्ट रोजी आपल्या मैत्रिणीसोबत अंधेरी येथील ‘जिमिज बर्गर’मध्ये गेली होती. दोघींनी तेथे काही खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली होती. यामध्ये ‘नाचो बन’ आणि ‘कोरियन व्हेजी बर्गर’चा समावेश होता. कोरियन व्हेजी बर्गर खात असताना तनिषाला अचानक त्यामध्ये काचेचा तुकडा असल्याचे आढळून आले.
सुदैवाने हा काचेचा तुकडा तनिषाच्या घशात अडकला नाही किंवा त्यातून कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, तो तुकडा घशात अडकला असता किंवा गिळला गेला असता गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती.बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचे लक्षात येताच तनिषा आणि तिच्या मैत्रिणीने तातडीने हॉटेल व्यवस्थापनाला बोलावून हा प्रकार दाखवला. मात्र, यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी कथितरीत्या अत्यंत बेजबाबदारपणे वागत काचेचा तुकडा फेकून दिला. त्यामुळे या घटनेतील महत्त्वाचा पुरावा नष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हॉटेल व्यवस्थापनाच्या या निष्काळजीपणावर तनिषाच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक आंबोली पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये खाद्यपदार्थातून काचेचा तुकडा आढळल्याच्या या प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबरोबरच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.