बालगृहाच्या भोजन व्यवस्थेसाठी २५ हजारांची मदत

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Prakash Educational Society सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत प्रकाश एज्युकेशनल सोसायटीतर्फे मैत्री परिवार संस्थेच्या बालगृहातील भोजन व्यवस्थेसाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश यादव यांनी मदतीचा धनादेश प्रदान केला.
 

gi 
 
यावेळी डॉ. यादव यांनी असहाय व गरजू मुलांच्या संगोपनासाठी मैत्री परिवार संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. या मदतीमुळे बालगृहातील मुलांच्या दैनंदिन भोजन व्यवस्थेला हातभार लागणार आहे. मैत्री परिवार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश एज्युकेशनल सोसायटी व डॉ. सूर्यप्रकाश यादव यांचे आभार मानले. कार्यक्रमाला चंदू पेंडके ,प्रकाश,रथकंठीवार बंडू भगत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य:हरीश जोगळेकर,संपर्क मित्र