गाडगेबाबा चौकात प्रवासी निवारा होणार

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Ramana Maruti Area रमना मारोती परिसरातील संत गाडगेबाबा चौक येथे बसथांबा मंजूर करून प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी गाडगेबाबा कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापौर नीता ठाकरे व परिवहन समितीच्या अध्यक्षा मंगला खेकरे यांच्याकडे केली.
 

param  
 
 
या परिसरातील नागरिकांना उन्हाळा व पावसाळ्यात बसची प्रतीक्षा खुल्या जागेत करावी लागते. तसेच या बसथांब्यावरून मेडिकल व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे थेट बससेवा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.यावर महापौर नीता ठाकरे यांनी सहा महिन्यांच्या आत प्रवासी निवारा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच चौकाला अधिकृतपणे ‘संत गाडगेबाबा चौक’ नाव देण्याचेही मान्य केले.शिष्टमंडळात परमेश्वर राऊत, विनोद वंजारी, राहुल अभंग, महेश बांन्ते, जयंतराव खैरकर, मनीष वानखेडे, नितीन रामटेककर, शंकरराव मौर्य, अक्षय ढोबळे, दिशांत राऊत, सौरभ राऊत, देवा भाऊ झाडे, नितीन मोंढे, मयुर कुथे, केदार कोठेकर, भोयर, समीर ईखार, मंगेश वंजारी, गजानन कांबळे आदी नागरिक उपस्थित होते.
सौजन्य: परमेश्वर राऊत,संपर्क मित्र