विज्ञान मेळाव्याने कामठी झाले विज्ञानमय

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
science fair infuses kamthi सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालय, कामठी येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाटोत्सव स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक जिज्ञासा विकसित व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती, विविध प्रयोग, प्रकल्प तसेच विज्ञानविषयक उपक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक ज्ञानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पंचायत समिती, कामठी यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीतर्फे मसारकर मॅडम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
 
science fair infuses kamthi
 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दाहाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य व्ही. बी. वंजारी, पर्यवेक्षक एन. डी. मेंढे तसेच विज्ञान विभागातील शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर स्पर्धांचे परीक्षण सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक योगेश मार्चटवार तसेच बावनकुळे यांनी केले. या विज्ञान मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक कल्पना, प्रयोग आणि प्रकल्प सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात विज्ञानमय वातावरण निर्माण झाले.
 
सौजन्य: सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र