सोलापूर
Solapur Onion Price सणासुदीच्या आधीच कांद्याच्या बाजारात तेजी आली असून सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला विक्रमी 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवार, 19 ऑगस्ट रोजी सोलापूरच्या कांदा बाजारात 28 हजार 228 पिशव्यांची आवक झाली. या कांद्याला 2 हजार 900 ते 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सोलापुरात एक नंबरच्या कांद्याला सध्या 5 हजार रुपयांहून अधिक दर मिळत असून सरासरी दर सुमारे 3 हजार रुपये प्रति क्विंटल आहे.
बुधवारी सोलापूर बाजार समितीत Solapur Onion Price कांद्याचे 146 ट्रक दाखल झाले. या कांद्याच्या लिलावातून तब्बल 4 कोटी 23 लाख 74 हजार 800 रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.खरीप हंगामातील नव्या कांद्याची आवक उशिराने सुरू झाल्याने बाजारात कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सध्या कांद्याची सरासरी किरकोळ विक्री 40 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात कांद्याचा किरकोळ दर सुमारे 26 रुपये प्रति किलो होता. त्यामुळे सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.