नागपूर,
students innovations to get a newdirection ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे STEAM SHAKTI LAB 4Future या कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव कासगावडे, उपसंचालक, क्रीडा व सेवा विभाग, नागपूर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी वर्षा खांबलकर, जिल्हा परिषद, माध्यमिक नागपूर, तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. चतुर्वेदी आणि आभा चतुर्वेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या अरुणा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित या क्षेत्रांतील सर्जनशीलता व कौशल्यविकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
सौजन्य: अरुणा कडू, संपर्क मित्र