आता दादा भुसेंकडे अभिजित दीपिकेचा मोर्चा!

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
लातूर,
Abhijit Dipke turns to Dada Bhuse लातूर जिल्ह्यातील शाळांमधील सुविधांच्या प्रश्नावरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी शाळांच्या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले. शाळेच्या इमारतीचे पत्रे गळत असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांतही या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता आल्या नसतील, तर शिक्षण विभागाने नेमके काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Abhijit Dipke turns to Dada Bhuse
 
 
शाळांची अशी अवस्था पाहता दादा भुसे यांनी शिक्षणमंत्री पदावर राहू नये आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे दिपके यांनी स्पष्टपणे म्हटले. शिक्षणमंत्री आणि आमदारांनी आपल्या मुलांना आधी जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवावे आणि तेथील परिस्थितीतच त्यांना शिक्षण घेऊ द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.अभिजीत दिपके सध्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. या अभियानाअंतर्गत त्यांनी औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत ग्रामस्थांकडून शाळेतील अडचणींची माहिती घेतली. यावेळी शाळेच्या संरक्षक भिंतीसह शौचालयासाठी निधी मंजूर झाला असतानाही मागील पाच वर्षांपासून काम सुरू झाले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी त्यांना दिली.यानंतर दिपके यांनी उजनीच्या ग्रामसेवकांशी फोनवरून संपर्क साधत मंजूर निधी आणि रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली. यावेळी ग्रामसेवकांनी चिडून उत्तर दिल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही शाळेच्या समस्या सुटत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.