केळझर,
haribhau lakhe केळझर येथे प्राणांची आहुती देणारे हुतात्मा शहीद हरिभाऊ लाखे यांच्या स्मृतीला चिरंतन उजाळा मिळावा, यासाठी त्यांच्या स्मारकावर पुतळा उभारण्यात यावा, यासाठी कलाकारांनी पुढाकार घेतला आणि पुतळा तयार करून पुतळा समितीच्या स्वाधीनही केला. हुतात्मा लाखे यांना स्मारकस्थळी मानवंदना देण्यासाठी पुतळा असावा, अशी संकल्पना पुतळा कलाकार रोशन इंगोले यांच्या मनात अनेक दिवसांपासून होती. इंगोले यांच्या संकल्पनेतून आणि ग्रे प्रोडक्शन, नागपूर येथील कलाकारांच्या परिश्रमातून हुतात्मा हरिभाऊ लाखे यांचा ४ फूट उंचीचा आकर्षक बस्ट साईज पुतळा तयार करण्यात आला आहे.

Type text here
त्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून लाखे यांच्या कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराशी संपर्क साधून त्यांचे जुने छायाचित्र संकलित केली. या छायाचित्रांच्या आधारे प्रथम मातीमध्ये त्रिमितीय (थ्रीडी) मॉडेल तयार करण्यात आले. हे मॉडेल कुटुंबीय व मित्रांना दाखवून त्यांच्या सूचनांनुसार आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर पुतळ्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करून त्याला कॉपर कलरिंग देण्यात आले. या पुतळ्याच्या निर्मितीत ग्रे प्रोडक्शनचे कलाकार रोशन इंगोले (केळझर), तुषार प्रधान (यवतमाळ), श्रीपाद भोंगाडे (हिंगणघाट), कृष्णा सालवडकर (नागपूर) यांच्यासह नीताई मुजूमदार, मयूर सोनटक्के, निखील नरताम, सुधांशू सोनटक्के, वैभव ईरटकर, मयूर कोथळे, आदित्य इंगोले (केळझर), उर्वशी डेकाटे (वर्धा), देवांशू अहुजा, करण बजाज (यवतमाळ), कुणाल बावणे (नागपूर), यांनी पुतळा साकारण्यासाठी योगदान दिले.