भाषा सेतू’तून उलगडली जपानची संस्कृती

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Bhasha-Setu  लिबरल एज्युकेशन सोसायटी संचालित हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘भाषा सेतू : भारतीयता आणि जपानी संस्कृतीचा मिलाप’ या विषयावर कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास आणि जागतिक दृष्टिकोन व्यापक करणे हा कार्यशाळेचा उद्देश होता.
 
 
bhasha
 
 
 
हडस हायस्कूलचे माजी विद्यार्थी व गेल्या ४० वर्षांपासून जपानमध्ये वास्तव्यास असलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय रानडे यांनी विद्यार्थ्यांना जपानमधील जीवनशैली, संस्कृती व शिस्तीविषयी माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जपानविषयी उत्स्फूर्तपणे संवाद साधला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव निलेश साठे व कोषाध्यक्ष विनय लाडकर होते. प्राचार्य अजय लाबडे, पर्यवेक्षिका डॉ. प्रज्ञा देशपांडे, सौ. चव्हाण व सौ. पुणसे उपस्थित होते. प्राचार्य लाबडे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर विचार करण्याची दृष्टी मिळते, असे सांगितले. आभार डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी मानले.
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र