‘सेवानिवृत्त पोलिस मदत केंद्र’ स्थापन करण्याची मागणी

सेवानिवृत्त पोलिसांच्या वेतन निश्चितीचा प्रश्न सोडविण्याची मागणी

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |

अनिल कांबळे

नागपूर, 

retired police assistance centre सेवानिवृत्त पोलिस सहायक व मार्गदर्शक समिती नागपूर व सेवानिवृत्त पोलिस बहजन परिवार बहुद्देशीय विकास संस्थेच्यावतीने शहरातील सेवानिवृत पोलिसांचा मेळावा व विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सेवानिवृत्त पोलिस हवालदारांना पदोन्नतीनंतरच्या वेतन निश्चितीचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी सेवानिवृत्त पोलिसांच्या मेळाव्यात करण्यात आली.

 
distributors account

राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी पोलिसांच्या वेतनातील तफावत तसेच सेवानिवृत्तीनंतर आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. या प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लेखा अधिकारी सुशील जक्कुलवार यांनी सेवानिवृत्तीनंतर निरोगी जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले. पेन्शनसंबंधी अडचणी सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 
सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक हेमंतकुमार नंदेश्वर यांनी हवालदारांच्या वेतन निश्चितीचा प्रश्न मांडला. गृह विभागाच्या १७ मार्च २०२२च्या शासन निर्णयानुसार पात्र पोलिसांना वेतन निश्चितीचा लाभ मिळणे अपेक्षित असतानाही अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १,२८७ हवालदारांची यादी प्राप्त झाली असून, त्यापैकी सुमारे ३०० जणांना लाभ मिळाला आहे. मात्र, एक हजाराहून अधिक हवालदारांचे आदेश अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. पात्र सेवानिवृत्त हवालदारांना लाभ मिळवून देण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात ‘सेवानिवृत्त पोलीस मदत केंद्र’ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. मेळाव्यास दिलीप नागपूरे, भारती तिवारी, विजयकांत मांडव, युवराज फुले, प्रल्हाद चव्हाण यांच्यासह सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उपस्थित होते.