मुंबई,
taapsee pannus तापसी पन्नूच्या आगामी ‘गांधारी’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, हा चित्रपट 3 सप्टेंबर 2026 पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’नंतर तापसी पन्नू आणि लेखिका-निर्माती कनिका ढिल्लन ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
देवाशीष मखिजा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गांधारी’मध्ये एका आईचा आपल्या मुलाला वाचवण्यासाठीचा संघर्ष आणि त्यासाठी ती उचलणारी टोकाची पावले दाखवण्यात आली आहेत. तापसी पन्नू या चित्रपटात ‘बानी’ची भूमिका साकारत असून, आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी ती कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार असल्याचे कथानकातून समोर येते.चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये तापसी एका धाडसी आणि कणखर महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या मागे देवीची सावली असलेली गूढ पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. पोस्टरमध्ये तापसीसोबत आणखी चार पात्रे दिसत असून, चित्रपटात सूड, संघर्ष आणि आपल्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या आईची कथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.