जळगाव,
Gold crosses the ₹1.5 lakh सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 1 लाख 58 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला, तर चांदीचा दर 2 लाख 48 हजार रुपये प्रति किलो झाला. हे दर जीएसटीशिवाय आहेत. गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 1 लाख 56 हजार रुपये होता. त्यात शुक्रवारी 2,500 रुपयांची वाढ होऊन तो 1 लाख 58 हजार 500 रुपयांवर पोहोचला. डॉलर इंडेक्समधील घसरण आणि अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदरात वाढ न करण्याचे संकेत यामुळे सोन्यातील गुंतवणुकीला चालना मिळत असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, जागतिक बाजारातील आकडेवारीनुसार 24 कॅरट शुद्ध सोन्याचा दर 20 ऑगस्टच्या 1 लाख 58 हजार रुपयांवरून 4,300 रुपयांनी वाढून 21 ऑगस्ट रोजी 1 लाख 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. हा गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकी दर आहे. यापूर्वी 26 मे रोजी सोन्याचा दर 1 लाख 62 हजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत गेला होता.

चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली. जळगावमध्ये गुरुवारी 2 लाख 40 हजार रुपये असलेला दर शुक्रवारी 8 हजार रुपयांनी वाढून 2 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचला. जागतिक बाजारातील आकडेवारीनुसार शुद्ध चांदीचा दर 2 लाख 35 हजार रुपयांवरून 2 लाख 45 हजार रुपये प्रति किलोवर गेला असून, त्यात 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हा गेल्या सात ते आठ आठवड्यांतील उच्चांकी स्तर असून, यापूर्वी 3 जुलै रोजी चांदीने 2 लाख 45 हजार रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला होता.
अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर झाला आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 66.31 डॉलरने घसरून 4,456.72 डॉलर प्रति औंसवर आला, तर चांदीचा भाव सुमारे दोन टक्क्यांनी घसरून 65.82 डॉलर प्रति औंस झाला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या घडामोडींमुळे स्पॉट गोल्डची किंमत 4,450 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. सोन्या-चांदीच्या दरातील या तेजीमुळे ग्राहकांसमोर आता खरेदी करावी की दर आणखी कमी होण्याची वाट पाहावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.