नागपूर,
Medha Medithon 2026 आरोग्यसेवा क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय स्पर्धा ‘मेधा मेडिथॉन २०२६’चे आयोजन २२ ऑगस्ट रोजी व्हीएनआयटी नागपूर येथे करण्यात आलेआहे.लीलाताई कुलकर्णी मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, केकतपुरे फाउंडेशन, इनयुनिटी, बीईटीआयसी-आयआयटी मुंबई, व्ही३एफ, व्हीएनआयटी नागपूर आणि बीईटीआयसी-जीएचआरसीई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे.स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ७० हून अधिक शहरांमधून ७०९ हून अधिक संघांनी नोंदणी केली. त्यापैकी १०२ संघांनी आपल्या कल्पना व उपाययोजना सादर केल्या असून, ४१ संघांची पुढील ‘पिचिंग राउंड’साठी निवड झाली आहे.
आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष समस्यांवर तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि नवकल्पनांच्या माध्यमातून व्यावहारिक उपाय शोधण्यावर स्पर्धेचा भर आहे. सहभागी संघांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. श्रेणी ‘अ’मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५० हजार, ३० हजार व २० हजार रुपयांची पारितोषिके, तर श्रेणी ‘ब’साठी ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.सर्वोत्तम १० संघांना इन्क्युबेशनचे सहाय्य मिळणार असून, सर्वोत्तम दोन संघांना नोव्हेंबरमध्ये आयआयटी मुंबई येथे होणाऱ्या ‘मेडिक’ अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आरोग्यसेवेतील कल्पकता, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांना एकत्र आणून प्रभावी व परवडणारे उपाय विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे
सौजन्य:उर्मिला सराफ,संपर्क मित्र