वेशभूषा अभिनय स्पर्धेत श्रीकांत पवनीकर प्रथम

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Nakshatra Hall, Nagpur लॉयन्स इंटरनॅशनल जिल्हा ३२३४ एचवनतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवार तलावाजवळील नक्षत्र सभागृहात दिमाखदार कार्यक्रम झाला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ प्रांतपाल लॉ. विलास साखरे, भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कर्नल अजय कपूर व अरुण चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी देशभक्तीपर गीते, वेशभूषा व अभिनय अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पर्यटन लेखक व मुक्त पत्रकार श्रीकांत पवनीकर यांनी १८५७ च्या क्रांतीतील मंगल पांडे यांची वेशभूषा साकारत ‘वेशभूषा अभिनय संवाद’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मंगल पांडे यांनी बैरकपूर छावणीत केलेल्या शौर्याचे साभिनय सादरीकरण त्यांनी केले.
 

yogesh 
 
 
दरम्यान, क्लबचे नवीन सदस्य राजेंद्र उबाळे यांनी ‘मेरे देशप्रेमियों, आपस में प्रेम करो’ हे गीत सादर करून देशभक्तीपर गीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे क्लबला दोन प्रथम पुरस्कार प्राप्त झाले.स्मार्ट सिटीचे रिजन चेअरपर्सन डॉ. रवींद्र हुसुकले यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लबचे अध्यक्ष अॅड. मनोज साबळे, प्रशासकीय अधिकारी अॅड. संगीता साबळे व प्रांतपाल लॉ. विलास साखरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य:योगेश बन,संपर्क मित्र