ज्योतिबा विद्यालयात रोबोटिक्स स्टीम लॅबचे उद्घाटन

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
नागपूर
Robotics STEAM Lab लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारा संचालित ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन नंदनवन येथे रोबोटिक्स, कोडिंग व इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी स्टीम लॅबची स्थापना करण्यात आली. लॅबचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी वर्षा खांबाळकर यांच्या हस्ते झाले.
 

jyoti 
 
 
यावेळी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक कसगवडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश चतुर्वेदी, सचिव आभाताई चतुर्वेदी, समन्वयक शेंडे, प्राचार्या अरुणा कडू व प्रशिक्षक चेतन खडसे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध रोबोटिक प्रकल्पांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जामुवंत वांदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आदेश जैन यांनी केले.
सौजन्य: जामुवंत वांदे ,संपर्क मित्र