वंदे मातरम्’ने दुमदुमले संस्कृत भवन

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
नागपूर
Vande Mataram संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या सुशोभित संस्कृत भवन परिसरात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन सामूहिक राष्ट्रगान व ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले.
 

nandan 
 
 
तत्पूर्वी जरीपटका येथील सिंधु महाविद्यालयात सभेचे सचिव डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी प्रमुख भाषण केले तसेच सभेने प्रकाशित केलेली दोन पुस्तके महाविद्यालयाला भेट दिली. संचालक डॉ. रुघवानी, प्राचार्य पेंडसे, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:नंदन वर्णेकर ,संपर्क मित्र