नागपूर,
Walker Road, Nagpur वॉकर रोड, मुकुंदराज लेन येथील साधू मंदिरात पंडित राजा काळे यांच्या गायनाने रसिकांना अनपेक्षित स्वरमैफिलीचा आनंद मिळाला. कोणतीही पूर्वसूचना अथवा औपचारिकता नसताना रंगलेली ही मैफिल अत्यंत आत्मीय वातावरणात झाली.
सुरुवातीला ह.भ.प. प्रा. रवींद्र साधू यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पंडित राजा काळे यांचा सत्कार केला. अभिषेकीबुवांच्या शिष्यपरंपरेतील काळे यांनी तोडी व यमन रागांची सुंदर मांडणी केली. संतसाहित्याचा सखोल अभ्यास असलेल्या त्यांच्या गायकीत परंपरा, चिंतन आणि स्वतंत्र शैलीचा सुरेख मिलाफ जाणवला.तबलावादक सचिन बक्षी यांनी समर्थ साथ देत मैफिलीची रंगत वाढवली. संगीत आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडविणारी ही स्वरमैफिल रसिकांच्या स्मरणात राहिली.
सौजन्य :अनिल देव,संपर्क मित्र