रोठा प्रकरणातील पीडित कुटुंबाला १० लाख मंजूर

७ सदस्यीय समितीचा निर्णय

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
वर्धा,
rotha case रोठा येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणातील पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेंतर्गत १० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गठीत एसआयटीने आरोपीविरुद्धचे दोषारोपपत्र बुधवार १२ रोजी न्यायालयात दाखल केले. त्यानंतर सोमवार १७ रोजी पार पडलेल्या बैठकीत पीडित कुटुंबाला १० लाख रुपये देण्याचे ७ सदस्यीय समितीने एकमताने निर्णय घेतला.
 

rotha case 
 
 
रोठा येथे १५ जुलैला घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी राहुल मडावी याला अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गठीत केलेल्या १० सदस्यीय विशेष तपास पथकाने आपला तपास २५ दिवसांत पूर्ण करून घटनेनंतर २८ व्या दिवशी आरोपीविरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात १२ ऑगस्टला दाखल केले.rotha case न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होताच जिल्हा विधि सेवा प्राधिकरणने सन २०२४ च्या शासन निर्णयानुसार कारवाई पूर्ण केली. मंजूर रकमेपैकी ७५ टक्के रक्कम मुदतठेव तर उर्वरित २५ टक्के रक्कम पीडित कुटुंबाच्या बँक खात्यात वळती करण्याची प्रक्रिया केली जात आहे.