कॉन्हेंट स्कूलच्या संचालकावर लैंगिक छळाचा गुन्हा

- शिक्षिकेला शारीरिक संबंधाची केली मागणी

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
case of sexual harassment खरबी येथील एका नामांकित कॉन्हेंट स्कूलच्या ७० वर्षीय संचालकावर महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिकेला कार्यालयात बोलवून अश्लील हावभाव करून तसेच तिला शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोप संचालकावर करण्यात आला आहे.
 

case of sexual harassment  
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय महिला शिक्षिका गेल्या वर्षभरापासून कॉन्हेंट स्कूलमध्ये कार्यरत आहे. शाळेचा संचालक अशोक जैस्वाल (७०) हा तिच्याशी वारंवार लैंगिक विषयांवर बोलत होता. तसेच तिला आपली ‘मैत्रीण’ होण्यास सांगत असल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. जैस्वाल याने आपल्याला तिच्याशी मैत्री ठेवायची असून, दोघांमधील संभाषण गोपनीय ठेवण्याचा आग्रह केला. तसेच काही दिवसांपासून शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. तसेच तिच्याकडे पाहताना अश्लील हावभाव करून तिला अस्वस्थ केल्याचा आरोपही तिने केला आहे.
महिलेने त्यांचे म्हणणे नाकारल्यानंतरही अशा प्रकारचे वर्तन सुरूच राहिल्याने आपल्याला मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.case of sexual harassment केवळ मैत्री करण्याचा उद्देश नसून, जैस्वाल यांचे वर्तन अयोग्य शारीरिक जवळीक साधण्याच्या उद्देशाने असल्याचा आरोपही तिने केला.महिलेच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी जैस्वाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.