काँग्रेसला वंदे मातरम् का नकोय?

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

congress वंदे मातरम् सुरू असताना राहुल गांधी आणि सोनिया गांधी या माय-लेकांनी या स्वातंत्र्याच्या मंत्राचा अपमान केला. वेदमंत्र सुरू झाल्यावर राक्षसांना जसा त्रास व्हायचा, तसा त्रास आणि चलबिचलता आपण पाहिली. या निमित्ताने पुन्हा एकदा वंदे मातरम्वर चर्चा सुरू झाली आहे. वंदे मातरम्ची दोनच कडवी का? काँग्रेसचा वंदे मातरम्ला विरोध का आहे? तो अचानक झालेला आहे का? तर असं नव्हे, याची पृष्ठभूमी आहे. खरं तर ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ऊर्जा आणि राष्ट्रवादाचा मुख्य आधारस्तंभ होते. १८७० च्या दशकात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले हे गीत १८८२ मध्ये त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीविरुद्धच्या आंदोलनादरम्यान ‘वंदे मातरम्’ हा भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्य घोष झाला. इंग्रजांनी लाठीहल्ला, गोळीबार केला तरी भारतीय क्रांतिकारक वंदे मातरम् म्हणत मृत्यूला आलिंगन देत होते. विशेष म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ च्या काँग्रेस अधिवेशनात हे गीत गायिले होते. परंतु, काळाच्या ओघात या गीताच्या काही भागांवरून राजकीय व धार्मिक मतभेद निर्माण झाले आणि त्यातूनच एक मोठा ऐतिहासिक वाद उभा राहिला.
 

congress and vande mataram controversy: why did the party oppose singing all verses? 
काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्तीपेक्षा हिंदू-मुस्लिम ऐक्याला फाजील महत्त्व दिलं. हिंदू-मुस्लिम ऐक्य सर्वांनाच हवं होतं. मात्र काँग्रेस त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होती. १९३० नंतर काँग्रेसने अतिरिक्त अहिंसावाद स्वीकारला. अहिंसा हे इंग्रजांविरुद्ध लढायचं प्रमुख तत्त्व झालं. पण हे अहिंसेचं तत्त्व जन्माने भारतीय असलेल्या आणि मनाने अरबस्थानात वावरणाऱ्या मुस्लिम समाजासाठी सुद्धा वापरण्यात आलं. मात्र तत्कालीन मुस्लिम समाज हा प्रचंड आक्रमक होता. या समाजाला असं वाटत होतं की त्यांनी अनेक वर्ष देशावर सत्ता चालवली होती, राज्य केलं होतं. म्हणून इंग्रज निघून गेल्यानंतर हा देश त्यांना मिळायला हवा. या देशावर इस्लामी सत्ता असायला हवी. म्हणजेच तत्कालीन मुस्लिम हे स्वतःला मुघलांचे वंशज मानत होते. खरे पाहता मुघल हे परकीय होते, भारतीय नव्हते, अत्याचारी आणि बलात्कारी होते आणि भारतीय मुस्लिम हे मूळचे हिंदू आहेत. हा तर्क लक्षात घेता, भारतीय मुस्लिमांची सत्ता या देशावर कधी नव्हती. आणि हा प्रश्न काँग्रेसला आणि काँग्रेसच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांना कधीच कळला नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्य या हट्टावर ते कायम राहिले. आणि त्यासाठी हिंदूंंचा बळी देण्यासही ते तयार होते. म्हणजे वाघ बकरीला खाऊन खाऊन कधीतरी कंटाळेल, त्याला शिसारी येईल आणि वाघ व बकरीचे ऐक्य होईल. अशा प्रकारची धारणा काँग्रेसने आत्मसात केली होती आणि तसा कारभार होत होता. सावरकर प्रभृती हिंदू नेत्यांना हा देश हिंदू राष्ट्रच हवा होता. मुस्लिमांना मुस्लिम म्हणून वेगळे अधिकार नाही, तसेच हिंदूंना हिंदू म्हणून वेगळे अधिकार नाही - सर्व समान आहेत हे तत्त्व स्वीकारायला तयार होते. मात्र हे तत्त्व मुस्लिम लीग स्वीकारायला तयार नव्हती. पाकिस्तानची मागणीही त्यातूनच जन्माला आली आहे.
१९३० च्या दशकात ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी ‘वंदे मातरम्’ गाण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांच्या विरोधामागे दोन प्रमुख कारणे होती. १. एकेश्वरवाद आणि मूर्तिपूजा : ‘वंदे मातरम्’च्या तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यात मातृभूमीची तुलना दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या हिंदू देवींशी करण्यात आली आहे. इस्लाममधील मूलभूत तत्त्वानुसार अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचीही पूजा किंवा वंदना करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे मुस्लिम लीगने याला धार्मिकदृष्ट्या अयोग्य ठरवले. २. ‘आनंदमठ’चा ऐतिहासिक संदर्भ : ही कादंबरी १८ व्या शतकातील संन्याशांच्या विद्रोहावर आधारित होती, ज्यामध्ये तत्कालीन मुस्लिम नवाबांच्या राजवटीविरुद्धचा संघर्ष चित्रित केला गेला होता. यामुळे मुस्लिम लीगने या गीताला मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप केला. मुस्लिम लीगच्या या विरोधानंतर आणि देशातील वाढत्या धार्मिक तणावाच्या पृष्ठभूमीवर, काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले. १९३७ मध्ये काँग्रेसने या विषयावर सखोल चर्चेसाठी एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचा समावेश होता.
या समितीने असा सल्ला दिला की, या गीताची पहिली दोन कडवी ही केवळ निसर्ग आणि मातृभूमीची समृद्धी दर्शवणारी आहेत; त्यात कोणतेही धार्मिक रूपक नाही. त्यामुळे काँग्रेसने १९३७ च्या अधिवेशनात असा ठराव संमत केला की, राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये केवळ ‘वंदे मातरम्’ची पहिली दोन कडवीच गायिली जातील. म्हणजेच काँग्रेसने मोहम्मद अली जिन्ना व्हर्जन स्वीकारलं. मुस्लिम लीगपुढे शरण गेल्यानंतरही त्यांनी पाकिस्तानची मागणी केली. दंगली झाल्या आणि भारताची फाळणी करावी लागली. फाळणी देखील सौजन्याने झाली नाही. त्यातही कत्तल, नरसंहर, बलात्कार या घटना घडल्या. फाळणीमुळे आपण पाक नावाचा कट्टर शत्रू तर निर्माण केलाच. पण मुस्लिम समाजाला भारतीय करण्यातही काँग्रेसला यश आलं नाही. काँग्रेस अनेक वर्षे निवडणुकीत जिंकत असला तरी तात्त्विकदृष्ट्या काँग्रेस पराभूत झाली होती. पण मुस्लिम तुष्टीकरण केल्याने मते मिळतात हे गणित त्यांच्या डोक्यात पक्के बसले होते. हिंदू व्होट बँक त्या काळी तयार झाली नव्हती. २०१४ नंतर हिंदू व्होट बँक तयार झाल्याने काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला वंदे मातरम् नकोय कारण छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, भगवान कृष्ण हे त्यांचे आदर्श नसून गांधी-नेहरू कुटुंब हेच त्यांचे आदर्श आहेत. आज जेन झीच्या नावाखाली ही मानसिकता जेन झोंबीला सोबत घेऊन देशात अराजकता माजवत आहेत. सैनिकांना शिव्या देणं कूल समजलं जातंय. काँग्रेसला भारत कळलेला नाही आणि दिमागी नक्षल हे तर भारत विरोधीच आहेत. म्हणूनच वंदे मातरम् सुरू होताच ते राक्षसांप्रमाणे अस्वस्थ होतात...