मालेगाव,
malegao accident समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक २४५, मुंगळा गावाजवळ भरधाव आयशर ट्रक डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात चालक अनिल गिरवर धाकड वय ३०, राहणार नेहारखेडा, तालुका विजयपूर, जिल्हा श्योपूर, मध्य प्रदेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अनिल धाकड हे मागील सुमारे पाच वर्षांपासून ट्रक चालविण्याचे काम करीत होते. त्यांच्या मालकीचा आयशर ट्रक क्रमांक एम. पी. ०७ झेड. टी. ६५७८ असून, ते मुंबई ते रीवा या मार्गावर माल वाहतूक करीत होते. २० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता माल घेऊन ते मुंबईहून रीवाकडे समृद्धी महामार्गाने निघाले होते.२१ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ४.२० वाजता अनिल यांचे मोठे बंधू सुनील गिरवर धाकड यांना ट्रकचा अपघात झाल्याची माहिती फोनद्वारे मिळाली. मुंगळा गावाजवळ झालेल्या या अपघातात अनिल यांच्या डोयाला व हाताला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. माहिती मिळताच सुनील हे नातेवाईकांसह घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, पोलिसांनी अनिल यांना उपचारासाठी वाशीम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. सुनील व त्यांचे नातेवाईक सकाळी सुमारे १०.३० वाजता रुग्णालयात पोहोचले. मात्र, उपचार सुरू असतानाच अनिल यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉटरांनी दिली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले.malegao accident त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने ट्रक डिव्हायडरला धडकून हा अपघात झाला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सचिन कल्ले करीत आहेत.