कारच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
वरुड
hit-by-car तालुक्यातील वरुड ते नागपूर महामार्गावरील चांदस येथे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक माजी सैनिकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालक इंद्रजित ऊर्फ पंकज युवराज राठोड (३८) रा. मानेवाडा नागपूर याला अटक केली. ही कार गौरव देशमुख रा. नागपूर यांच्या नावाने असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
sainik
 
हातुर्णा येथील माजी सैनिक अनिल चौधरी (५०) ह. मु. विजय नगर वरुड यांचे शेत घोराड येथे आहे. चौधरी वरुड येथून सकाळी आपल्या दुचाकीने शेतात जाण्यासाठी निघाले. तेव्हा वरुड ते वाठोडा मार्गावर ग्राम चांदस येथे त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या अपघातात चौधरी हवेत फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. हा अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात चौधरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.