नागपूर,
Late Pt. Rajabhau Kogje ज्येष्ठ शास्त्रीय गायक स्व. पं. राजाभाऊ कोगजे यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त चिटनवीस सेंटर फॉर कल्चर अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटतर्फे २६ व २७ ऑगस्ट रोजी चिटनवीस सेंटर येथे दोन दिवसीय शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पं. राजेंद्र भावे यांचे तबला वादन, तर ७ वाजता बनारस घराण्याचे गायक राहुल व रोहित मिश्रा यांचे गायन होईल. २७ ऑगस्ट रोजी ६ वाजता प्रो. सुजाता व्यास व पं. अनिरुद्ध देशपांडे यांचे गायन आणि ७.१५ वाजता स्व. पं. राजाभाऊ कोवजे यांच्या मैफिलीचे पुनर्प्रसारण होणार आहे.कार्यक्रमास प्रवेश निःशुल्क असून संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:डॉ. लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र