मालेगाव,
malegaon police तालुयातील पांगरीकुटे बसस्थानक परिसरातील गजानन हरिभाऊ कुटे यांच्या मालकीच्या जय महाराष्ट्र मोटर रिवाइंडिंग दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह ३५ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. २० ऑगस्टच्या रात्री ते २१ ऑगस्टच्या सकाळदरम्यान घडलेल्या या चोरीचा तपास करत मालेगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसया आवळण्यात यश मिळविले आहे.
मालेगांव पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे परिसरात झालेल्या इतरही चोरीच्या घटना उलगडण्याची शयता आहे. सदर कारवाईमुळे तालुयात समाधान व्यक्त करण्यात आले आहे. दुकानमालक गजानन कुटे राहणार पांगरीकुटे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान सीसीटीव्ही टिव्ही फुटेजच्या आधारे व ठाणेदार राजेश खेरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदारांच्या निर्देशानुसार पोलिस पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील बीबीजवळील रामभरोसे ढाब्यावर कारवाई करत रामनारायण डिगांबर चव्हाण वय ४०, राहणार खापरखेडा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा आणि हमीद खान शाबास खान वय ४२, राहणार डोणगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेतले.या कारवाईत पंचांसमक्ष आरोपींकडून सोनेरी रंगाची इनोव्हा कारसह एकूण १२ लाख २० हजार ७७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नितेश खाटमोडे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेश खेरडे, पोहेकॉ सचिन कल्ले, शिवाजी काळे, सुनील पवार, पोकॉ गणेश मेटांगळे, अमोल पवार आणि वैभव झरकर योगेश इंगळे यांच्या पथकाने केली.