... अन् ती थरारक १५ मिनीटे...

अन्यथा महिला झाली असती बाळाला घेऊन पसार

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

nagpur baby theft case  स्वतःचे नवजात बाळ जन्मताच मृत पावल्यामुळे अस्वस्थ झालेली माता अन्य बाळाचा शोध घेत होती. मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात जाऊन प्रसुत झालेल्या मातेच्या बाळावर नजर ठेवून होती. शुक्रवारी संधी मिळताच तिने बाळ चोरले आणि थेट आपल्या पतीच्या घरी औरंगाबादला निघून जाणार होती. रेल्वे सुटण्यास केवळ १५ मिनीटांचा अवधी बाकी होता. पोलिसांना कुणकुण लागताच जवळपास २०० पोलिसांनी शहर पिंजून काढला. त्या १५ मिनिटांच्या थरारादरम्यान रेल्वे सुटण्यापूर्वीच बाळ चोरणाऱ्या महिलेला सापळ्यात अडकवून ताब्यात घेतले. आशिया अंजुम सय्यद अल्ताफ (३०) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
 

nagpur baby theft case just 15 minutes before train departure, police rescue newborn and arrest woman 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आशिया ही मूळची यशोधरानगरातील असून तिचे लग्न औरंगाबादमधील सय्यद अल्ताफ याच्याशी झाला. ती गर्भवती होती आणि प्रसुतीसाठी माहेरी नागपुरात आली. गेल्या १३ ऑगस्टला तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. मात्र, तो आनंद औटघटकेचा ठरला. तिचे बाळ चोवीस तासांतच मृत पावले. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. तिला तिच्या भावाने घरी नेले. मात्र, ती बाळ मृत पावल्याबाबत विश्वासच ठेवत नव्हती. तिला बाळासह सासरी जायचे होते. त्यामुळे ती गेल्या आठ दिवसांपासून मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालायात जाऊन बाळाबाबत चौकशी करीत होती. शेवटी तिला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ सुचली. तिने बाळ चोरी करण्याचा कट रचला. एखाद्या सराईत आरोपीसारखे तिने बाळ चोरीचे नियोजन केले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ती डागा रुग्णालयात आली. तिने शासकीय निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवू बाळ चोरी केले. बाळासह ई रिक्षाने ऑटोने यशोधरानगरातील माहेर गाठले. तिने बाळाला पाळण्यात झोपवले आणि थेट रेल्वे स्टेशन गाठले.
शेजाऱ्यांची सतर्कता
आयशाचे बाळ १३ ऑगस्टलाच मृत पावल्याची माहिती यशोधरानगरातील शेजाऱ्यांना होती. मात्र, ती आज बाळासह घरी आल्यामुळे शेजाऱ्यांना धक्का बसला. त्यामुळे एका शेजाऱ्याने तहसीलचे ठाणेदार संजय मेंढे यांना खबर दिली. त्यांनी लगेच पाच पथकांसह यशोधरानगर परिसर पिंजून काढला. शेवटी एका घरात पोलिस शिरले आणि बाळ पाळण्यात शांतपणे झोपलेले दिसले. पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
 
 
तिकिट घेऊन परतताना खेळ संपला
आयशाने आपल्या गावी परत जाण्यासाठी तिकिट काढले आणि घराकडे निघाली. १५ मिनिटातच बाळाला घेऊन ती माहेरी निघणार होती. यादरम्यान पोलिसांनी तिच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन ट्रॅक केले. तिचा पाठलाग करीत असतानाच तिच्या लक्षात आले. तिने ई रिक्षातून उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने बाळ चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली.