अनिल कांबळे
नागपूर,
nagpur minor car crash case आपल्या १६ वर्षीय मुलाना कार दिल्यानंतर त्याने कारच्या अपघातात दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलाचे वडील आनंद याला कळमना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक करून आनंद याला न्यायालयात शुक्रवारी हजर केले. न्यायाधीश एस. ए. गवई यांनी आरोपीला रविवार ( २३ ऑगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या अपघातातील विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाचे आई-वडील आनंद आणि सोनाली यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी गुरूवारी नाकारल्यानंतर आनंद याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. मध्यस्थी अमोल लारोकर यांच्यातर्फे अॅड. समीर सोनवणे, अॅड. अमीत ठाकूर, अॅड. पूजा किशोर अदानी यांनी बाजू मांडली.
१२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ च्या सुमारास एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या ताब्यातील कार अत्यंत वेगाने व निष्काळजीपणे चालवून ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालवणारा मुलगा जखमी झाला. आनंद यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतानाही अपघातानंतरचा आणि आधीचा सर्व डेटा व रेकॉर्डिंग डिलीट करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर मुलाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील रॅश ड्रायव्हिंगचे व्हिडिओ देखील हटवण्यात आले होते. घरचे सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील पुरावे हटवण्याबाबत अर्जदारांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडी मागितली आहे.