नागपूर (कामठी)
Porwal Junior College सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘भारतीय बँकिंग प्रणाली’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी उद्बोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. युनियन बँक ऑफ इंडिया, कामठी शाखेच्या शाखा व्यवस्थापिका नीलिमा रामटेके यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्राचार्य व्ही. बी. वंजारी, पर्यवेक्षक नरेंद्र मेंढे, विभागप्रमुख डॉ. किरण पेठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पंकज वाटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हिना कौसर यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:प्रा. पंकज वाटकर ,संपर्क मित्र