नुकताच पदवीधर झाला; पण स्वप्न पूर्ण करण्याआधीच मृत्यूने गाठले

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
पुणे
pune road accident नुकतीच B.Sc. पदवी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर PMPML बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा भीषण अपघात झाला. रिद्धेश विनय शिंदे (वय २१, रा. जयभीमनगर, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी PMPML बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
pune road accident 21-year-old b.sc graduate dies after collision with pmpml bus
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रिद्धेश दुचाकीवरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने दापोडीच्या दिशेने घराकडे जात होता. वाकडेवाडीतील भुयारी मार्गाजवळ दापोडीकडे जाणाऱ्या PMPML बसला पुढे जाऊन ओव्हरटेक करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, वळणावर बसचालकाने बस वळवली असता दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेनंतर रिद्धेश दुचाकीसह थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
नुकतीच पदवी मिळवून पुढील आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या रिद्धेशचा अचानक मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत रिद्धेशचे वडील विनय शिंदे (वय ४५) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
a