चिंचपूर,
late bhausaheb fundkar चिंचपूर येथे महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री तथा ज्येष्ठ लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही स्व भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन चिंचपूर येथे अनंता शेळके यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या सामाजिक, राजकीय व शेतकरी हिताच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.late bhausaheb fundkar कार्यक्रमाला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबुलाल राठोड, उपाध्यक्ष मोहन क्षिरसागर, विलासराव देशमुख, रामदास गाडगे, संतोष उपासे, विश्वंभर कचाले, दामोधर फाळके, राजुदास राठोड, सुधाकर बारगळ, गजानन निर्मळ, राम उपासे, प्रकाश गाडगे, राम महानकार, शिवशंकर काळे, मधुसूदन शेळके, संतोष निर्मळ, भगवान जाधव, विशाल क्षिरसागर, गोपाल राठोड, जानू राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेषतः यंदाच्या कार्यक्रमात युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.