नागपुरात शिवभक्तीचा महासागर

९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प- मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः बनवली ३ शिवलिंगे

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
chief-minister-fadnavis श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर मानकापूर येथील शिवमंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला आहे. लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे आयोजित भव्य पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन स्वतः हाताने तीन पार्थिव शिवलिंगांची निर्मिती केली.

shankar 
 
 

मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांनी प्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी हजारो भाविक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग बांधवही मातीपासून शिवलिंग बनवत होते, हे दृश्य पाहून मन प्रसन्न झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

‘भारतीय संस्कृतीत शिवआराधना महत्त्वाची आहे. आदी-अनंताचे प्रतीक म्हणजे शिव. या शिवपूजेतून आत्मिक शांतता व मानसिक स्थैर्य मिळते. श्रावणात आयोजित या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण पवित्र झाले आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
सोहळ्याचे वैशिष्ट्य काय?

- ९१ लाखांचा संकल्प : सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या एक महिना चालणाऱ्या सोहळ्यात यंदा ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला आहे.

-गंगेच्या मातीपासून शिवलिंग : या शिवलिंगांसाठी खास गंगा तीरावरून पवित्र माती आणण्यात आली आहे.

- रोज विसर्जन : दररोज तयार केलेल्या हजारो शिवलिंगांचे सूर्यास्तानंतर विधिवत विसर्जन केले जाते. १२ सप्टेंबर रोजी यज्ञ आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

यावेळी सोहळ्याचे संयोजक दयाशंकर तिवारी, अनिल बावनगडे, अमोल कोल्हे, आशिष पाली, नवीन जैन, प्रभाकर ठाकरे व समितीचे सदस्य उपस्थित होते.