अंकुर प्री स्कूलमध्ये पर्यावरणपूरक राखी बनवा स्पर्धा

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Ankur Pre School मुलांची कल्पनाशक्ती आणि पालकांचे मार्गदर्शन यांच्या सुरेख संगमातून अंकुर प्री स्कूलमध्ये आगामी राखी पौर्णिमेनिमित्त ‘पर्यावरणपूरक राखी बनवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिला कला निकेतनद्वारा संचालित अंकुर प्री स्कूलच्या या स्पर्धेत ३५ हून अधिक मुलांनी पालकांसह सहभाग घेतला.
 
 
ankur
 
 
निसर्गातील फुले, पाने तसेच टाकाऊ वस्तूंचा कल्पक वापर करून मुलांनी आकर्षक राख्या साकारल्या. स्पर्धेचे परीक्षण रूपल धुरिया आणि मृणाली वाठ यांनी केले. शाम्भवी व पल्लवी बांद्रे यांनी प्रथम, प्रणिका व पूजा माकडे यांनी द्वितीय, तर सान्वी व सोनी सिरसवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना संस्थेच्या कोषाध्यक्ष आरती आठवले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:सुफला ताटके,संपर्क मित्र